मंडप उखडला तरी व्हिडिओकॉनच्या कर्मचार्‍यांचे उपोषण सुरूच

Foto
व्हिडीओकॉन कर्मचार्‍यांच्या वतीने ’हाताला काम द्या वेतन द्या’ या मागणीसाठी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर गेले 359 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. असे असताना देखील मागणी पूर्ण झालेली नसून पोलिसांनी मंडप देखील तोडून टाकला आहे. असे असताना देखील व्हिडीओकॉन कर्मचार्‍यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. 
व्हिडिओकॉनच्या कर्मचार्‍यांच्या उपोषणाला 359 दिवस पूर्ण होऊनही मागण्या मान्य झालेल्या नाही. त्यात पोलिसांनी कुठलीही पूर्वसूचना न देता उपोषणकर्त्यांचा मंडप तोडून टाकला अशी खंत कर्मचार्‍यांनी व्यक्त केली. असे असले तरी पुन्हा कर्मचार्‍यांनी उपोषण करणे सुरूच ठेवले आहेत. त्यात कोव्हीड -19 मुळे आज कर्मचार्‍यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. गेले दोन वर्षापासून 340 कामगारांचा पगार मिळालेला नाहीत आणि हाताला काम देखील नाही. त्यामुळे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर उपोषण केले जात आहे. मात्र पोलिसांनी उपोषणाकर्त्यांचा मंडप मोडून टाकला आहे. असे असले तरी व्हिडीओकॉन ग्रुप एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष गजानन खंदारे यांनी पुन्हा उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.
एकटा उपोषण करेल: गजानन खंदारे
कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. आधीच हाताला काम नाही, पगार नाही यामुळे उपासमारीची वेळ आम्हा कर्मचार्‍यांवर आली आहे. त्यामुळे गेले 359 दिवसांपासून उपोषण केले जात आहे. असे असताना देखील आमची दखल घेतली नाही. त्यात आमचा मंडप तोडून टाकला असल्याची खंत व्हिडीओकॉन ग्रुप एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष गजानन खंदारे यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना व्यक्त केली. असे असले तरी मी एकटा उपोषण करेल. मला उपोषणाला बसू द्या अशी विनंती मी करत असल्याचे त्यांनी सांगितले.