जिल्ह्यात आज ६७ कोरोनाबाधितांची वाढ

Foto
जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ६७ कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही १३३१९ वर जाऊन पोहचली आहे. 

जिल्ह्यातील आतापर्यंत आढळलेल्या १३३१९ कोरोनाच्या रुग्णांपैकी ८९५३ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ४४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सध्या ३९१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शहरात ५५ रुग्ण वाढले
शहरात आणखी ५५ रुग्ण वाढले आहेत. त्यात उस्मानपुरा -१, पंचशीलनगर, मोंढानाका -१, मुकुंदवाडी-६, भगतसिंगनगर, हर्सुल -१, एमजीएम परिसर-१, छावणी परिसर-२, पृथ्वीराजनगर, शहानूरवाडी-१, एन सात सिडको-१, भाजीबाजार-४, गवळीपुरा, छावणी-४, देवळाई, सातारा परिसर-१, केबीएच नर्सिंग हॉस्टेल परिसर-२, श्रीकृष्ण नगर, एन नऊ सिडको-१, मिलिट्री हॉस्पीटल-१, न्यू हनुमान कॉलनी-१, म्हाडा कॉलनी-१, रामनगर, मुकुंदवाडी-७, चिकलठाणा-२, संतोषी मातानगर, मुकुंदवाडी-१, उल्कानगरी-२, एन दोन सिडको-२, शिवाजीनगर-२, शांतीनाथ सोसायटी-१, मिटमिटा -१, पदमपुरा-२, उस्मानपुरा-५, इतर-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
ग्रामीण भागात १२ रुग्ण वाढले
ग्रामीण भागात १२ रुग्ण वाढले आहेत. त्यात साजापूर, वाळूज -१, बजाजनगर-१, गोंदेगाव, सोयगाव-१, सिडको महानगर वाळूज-१, गदाना -४, शिवाजी चौक, गंगापूर-१, जाधव गल्ली, गंगापूर-१, सावंगी, गंगापूर-१, मांडवा, गंगापूर -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.