जिल्ह्यात आज ८४ रुग्णांची वाढ; दोघांचा मृत्यू

Foto
जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात ८४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ही १०१६६ झाली आहे. तर आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात ३८७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. 

आज सकाळी आणखी ८४ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात एकूण आतापर्यंत १०१६६ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५८६१ बरे झाले, तर आतापर्यंत एकूण ३८७ जणांचा मृत्यू झाला. तर सध्या ३९१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये पाच जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 
*शहरात १२ रुग्ण *
शहरात कोरोनाचे १२ रुग्ण आढळून आले. त्यात सादातनगर १, पुंडलिकनगर १, चिकलठाणा १, संजयनगर १, हिमायतबाग १, पदमपुरा १, क्रांतीनगर १, मिल कॉर्नर १, अमृतसाई प्लाजा १, छावणी परिसर १, छत्रपतीनगर, सातारा परिसर १, इतर १ या भागातील रुग्ण आढळून आले. 
ग्रामीण भागातील ६७ रुग्ण
ग्रामीण भागातील ६७ रुग्णांची नव्याने वाढ झाली. त्यात कन्नड १, इंदिरानगर, गोंदेगाव १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर २, राधेय सोसायटी बजाजनगर ७, महालक्ष्मी सोसायटी बजाजनगर १, छावा सोसायटी बजाजनगर ३, सिडको महानगर ४, वाळूज, बजाजनगर ५, स्वस्तिकनगर १, वीर सावरकर कॉलनी, बजाजनगर १, बजाजनगर १, चिंचबन कॉलनी, बजाजनगर २, जय भवानी चौक, बजाजनगर ४, न्यू संजिवनी सोसायटी, बजाजनगर १, गजानन सोसायटी बजाजनगर १, जिजामाता सोसायटी बजाजनगर १, ओमशक्ती सोसायटी बजाजनगर १, बकवालनगर, नायगाव १, अविनाश कॉलनी, शिवाजीनगर, वाळूज १, अजिंक्यतारा सोसायटी शिवाजीनगर, वाळूज १, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, सरस्वती सोसायटी १, जागृत हनुमान मंदिर परिसर १, शिवकृपा सोसायटी बजाजनगर १, ओमसाई नगर,रांजणगाव १, स्नेहांकित सोसायटी, बजाजनगर ३, मोहटा मंदिराजवळ, बजाजनगर १, शिवनेरी सोसायटी बजाजनगर १, मयूर पार्क १, बजाजविहार २, अक्षर सोसायटी बजाजनगर १, रांजणगाव, गंगापूर ३, भानुदास नगर, गंगापूर २, वैजापूर ८ या भागातील रुग्ण आढळून आले. 
सिटी एंट्री पाँइटवर ५ रुग्ण
सिटी एंट्री पाँइटवर ५ रुग्ण आढळून आले. त्यात बजाजनगर १, जाधववाडी २, कांचनवाडी १, वडगाव १ या भागातील रुग्ण आढळून आले. 
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शहरातील खासगी रुग्णालयात रेहमानिया कॉलनीतील ६२ वर्षीय, जाधवमंडी राजा बाजारातील ६० वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.