आणखी एक आरपीएफ जवान पॉझिटिव्ह रेल्वे स्थानकावर १५२ जणांची टेस्ट

Foto
सांजवार्ताच्या दणक्यानंतर आता दररोज रेल्वे प्रवाशांची अँटीजन टेस्ट केली जात आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या संसर्गाला वेळीच रोखता आले.  सचखंड एक्सप्रेसने येणाऱ्या प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी असे एकूण १५२ जणाची आतापर्यंत तपासणी करण्यात आली. त्यात काल दोन तर आज एक आरपीएफ जवान पॉझिटिव्ह आढळून आला.  
अमृतसर -नांदेड आणि नांदेड-अमृतसर विशेष एक्सप्रेस या दोन रेल्वे सध्या सुरू करण्यात आल्या आहेत. या प्रवाशांची दैनिक सांजवार्ता च्या बातमीमुळे स्वॅब तपासणी करण्यास कालपासुन सुरुवात झाली आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानकात प्रवाशांसह तेथिल सुरक्षा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात आली. यात काल दोन आरपीएफ कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर आज दुपारपर्यंत ३४ प्रवाशी आणि इतर रेल्वे कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी असे एकूण ७४ जणांचे स्वॅब टेस्ट करण्यात आली. त्यात आज एक आरपीएफ कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे संबधित अधिकारी यांनी सांजवार्ताशी बोलताना सांगितले.
७८ जणांचे घेतले पहिल्या दिवशी स्वब
औरंगाबाद रेल्वे स्थानकात रविवारी स्वब तपासणीस सुरू झाली. त्यात पहिल्या दिवशी ७८ जणांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. त्यात बाहेरून आलेल्या २६ प्रवाशांची स्वब टेस्ट करण्यात आली. तर इतर आरपीएफ सह आदी रेल्वे कर्मचाऱ्यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. एकूण ७८ जणांचे स्वॅब टेस्ट करण्यात आल्या.