राजकीय क्षेत्र हादरले
काल शिवशंकर कॉलनीचे माजी नगरसेवकाचा तर आज पडेगाव येथील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा कोरोनाने बळी घेतल्यामुळे राजकीय क्षेत्र हादरले आहे. सलग दोन दिवस नगरसेवकांच्या मृत्यूच्या बातम्यांनी शहरातही हळहळ व्यक्त होते आहे.
पडेगावचे ४५ वर्षाचे शिवसेनेचे माजी नगरसेवक यांचा आज पहाटे ४ वाजता एका खासगी रुग्णलयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.
गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना घाटी रुग्णालयात उपचारसाठी दाखलही करण्यात आले होते. त्यादरम्यान त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना २५ जून रोजी शहरातील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत माळवली.












