कंबरेला दोन गुप्ती घेऊन रस्त्याने फिरणार्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई मिसारवाडी गल्ली क्रमांक 10 मध्ये करण्यात आली.
सागर संजय ढगे वय-21 (रा. गल्ली क्रमांक -5 मिसारवाडी,) असे आरोपीचे नाव आहे.दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मिसारवाडी भागातील रिक्षा स्थानकाजवळ एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असून काही तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यावरून पथकाने तातडीने मिसारवाडी गाठत तरुणाची झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन गुप्ती पोलिसांना आढळून आली या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल, प्रकाश चव्हाण, शिवाजी झिने प्रभाकर राऊत यांच्या पथकाने केली आहे.