महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती; मंत्रिपदाचा दर्जा

Foto
केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या राज्यातील विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी गठित  महाराष्ट्र राज्य  संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील संसद सदस्यांची बैठक झाली होती. त्यामध्ये केंद्र शासनाकडे प्रलंबित प्रस्तावांबाबत चर्चा झाली होती. या प्रस्तावांचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी खासदार श्री. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
समितीचे अध्यक्ष श्री. सावंत यांचे कार्यालय नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे असेल. त्यांना कामकाजासाठी आवश्यक सुविधा तसेच अधिकारी- कर्मचारी नवी दिल्लीतील सचिव तथा निवासी आयुक्त,  महाराष्ट्र सदन यांच्याकडून देण्यात येणार आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker