कोरोनामुळे धास्तावले नागरिक
याआधी ताप आल्याची कारणे सांगून शाळेला बुट्टी मारता येत होती. ऑफिसला जाण्याचा कंटाळा जरी आला तरी ताप आल्याची कारणे सांगितले जात होती. परंतु आता ताप आला म्हणाले तरी कुणाला सांगू नको बर का? असे अनेकजण म्हणत आहे. यावरून कोरोनामुळे नागरिक धास्तावले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोनामुळे अनेकजण धास्तावले आहेत. ताप येणे, सर्दी, खोकला, शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होणे यासारखी कोरोना आजाराची लक्षणे आढळून आली की, तात्काळ डॉक्टरांना दाखवा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहेत. परंतु दुसरीकडे अजूनही अनेकजण ताप आला तरी कोणाला सांगत नाही. घरामधील नातेवाईक पण याला सहकार्य करताना दिसतात. त्या ताप आलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्याचे सोडून त्याला उलट 'ताप आला म्हणून कुणाला सांगू नको, गोळी घे' असा सल्ला देत आहेत. अनेकजण यामुळे आपला आजार लपवित असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.
वॉट्सएप स्टेस्ट्सवरून पण आता तापेचे सिम्बॉल गायब
कॉलेजला जाण्याचा कंटाळा आला की, अनेकजण शिक्षकांना ताप आल्याची कारणे सांगून कॉलेजला सुट्टी मारायचे. आणि वॉट्सएप स्टेस्ट्सला देखील ताप आल्याचे सिम्बॉल टाकायचे. पण आता कोरोनामुळे असे झाले की, ताप आल्याचे सिम्बॉल आता गायब झाल्याचे दिसून येत आहे.
कुठलाही आजार लपवू नका
ताप आला आहे तर घाबरून जाता कामा नये. आणि त्यात लपविण्याचे देखील कारण नाही. ताप येणे किंवा सर्दी, खोकला येणे तसेच इतर कुठल्याही प्रकारचा आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कारण त्वरित उपचार केले तर आजारावर निदान होऊ शकते. हे लक्षात घ्यायला हवे. आणि घरातील सदस्यांनी देखील ताप आलेल्या व्यक्तींना ताप आला आहे तर त्याकडे दुर्लक्ष न करता घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन डॉक्टरांच्या वतीने करण्यात येत आहे.











