आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

Foto
 मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले. सातार्‍यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आशालता यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र कोविड न्युमोनियामुळे त्यांची प्राणज्योत पहाटे 4 वाजता मालवली.
आशालता या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोर्चा मालिकांकडे वळविला होता. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. मात्र या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर 5 दिवस सातार्‍यातील प्रतिक्षा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेले 5 दिवस त्या सातार्‍यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील कोविड अति दक्षता विभागात व्हेंटिलेटर वर होत्या, परंतु अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती अति दक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker