औरंगाबाद दि :- राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने शेतकर्यांची फसवणुक चालवली तसेच महिलांवरील वाढल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने राज्य पातळीवर आयोजित ‘भाजपचा एल्गार’ अंतर्गत येथील शहर जिल्हा भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे शेतकर्यांना झालेल्या नुकसानभरपाई म्हणून बागायत 50 हजर आणि जिरायत 25 हजार हेक्टरी मदत ची घोषणा या सरकारने केली होती. सत्तेत आल्यावर जाणीव पूर्वक वचन विसरले. मार्च पूर्वी शेतकरी कर्जमाफी देण्याची मागणी आम्ही केली होती परंतु अजून पर्यंत कर्जमाफी नाही. मागच्या सरकारने घातलेल्या अटी या सरकारने घातल्या. कर्जमाफी मध्ये निसंगती आहे. सातबारा कोरा करण्याचं आश्वासन सरकारने पाळलं नाही. म्हणून धरणे आंदोलन. जलयुक्त शिवार सारखी योजना आणि अन्य योजना या सरकारने बंद केल्या आणि अजून करत आहेत. शेतकरी हिताच्या योजना मध्ये अडचणी असेल तर दुरुस्त करा गुन्हेगार ला शिक्षा करा पन योजना बंद करू नका. शेतकर्या ला फायदा झालेला सरकार ला सहन होत नाही. वीज आणि डीपी ची समस्या गंभीर आहे. 15 दिवस डीपी न मिळाल्याने पीक जळून जातात. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण या सरकार च्या काळात वाढले आहे. सिल्लोड येथील अंधारी येथे महिलेला जाळून मारल्याचा प्रकरणात गृहमंत्र्यांनी वेगळे संबंध असल्याचे वक्तव्य केले. महिलांवर अत्याचार करणार्या गुन्हेगारांना धाक बसविणे ऐवजी महागडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. या वेळी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड भाजपाचे शहराध्यक्ष संजय केनेकर भाजपा प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रमोद राठोड, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, समीर राजूरकर, बसवराज मंगरुळे, भाऊराव देशमुख, प्रशांत देसरडा, राजगौरव वानखेडे, रवी एडके, ज्ञानोबा मुंडे, माधुरी आदवंत, लता दलाल, दिलीप थोरात, कचरू घोडके यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी पदाधिकारी धरणे आंदोलनात सहभागी होते. या धरणे आंदोलनात महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी संख्या उपस्थित होती.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपने केलेल्या धरणे आंदोलनात आज नेते जास्त अन कार्यकर्ते कमी अशी परिस्थिती दिसून आली. शहरात निवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेते आणि पदाधिकारी मात्र आवर्जून उपस्थित होते. महिलांची मोठी उपस्थिती होती, मात्र कार्यकर्त्यांचे वानवाच होती.
महाआघाडी सरकारने शेतकर्यांची फसवणूक केली तसेच महिला अत्याचारात वाढ झाली या विरोधात भाजपने आज राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनाच्या निमित्ताने शहरातील भाजप नेते मंडळी एकवटली होती.पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर भाजप नेत्यांना जणू आंदोलनाचा विसर पडला होता. राज्यात सत्ता गेल्यानंतर आता भाजपने पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मंडप उभारण्यात आला होता. आंदोलनात शहरातील झाडून सारे नेते हजर होते. शहराध्यक्ष संजय केनेकर, डॉक्टर भागवत कराड, शिरीष बोराळकर, प्रमोद राठोड, बसवराज मंगरुळे अनिल मकरिये यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक शहरातील पदाधिकारी तसेच महिला पदाधिकार्यांची मोठी उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांची वानवा
दरम्यान आंदोलन म्हटले की, घोषणाबाजी करणारे आंदोलक, कार्यकर्ते परिसर दणाणून सोडतात. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत वातावरण निर्मिती केली जाते. कार्यकर्ते जेवढा रोष व्यक्त करतात तेवढे नेतेमंडळी करत नाहीत. भाजपाच्या धरणे आंदोलनात कार्यकर्त्यांची वानवा असल्याने घोषणाबाजी दमच नव्हता. नेते-कार्यकर्ते गळ्यात रुमाल घालून स्वस्थ बसले होते. दोन-चार कार्यकर्ते तेवढे घोषणाबाजी करत होते. त्यामुळे नेते मंडळी असूनही अपेक्षित परिणाम दिसून आला नाही.