बँकेचे अध्यक्ष जेरबंद..

Foto
 तक्रारदार यांची कर्जाची फाईल मंजूर करण्यासाठी व मंजूर केलेल्या कर्जाची उर्वरित  रक्कम बँकेतून तक्रारदार यांना देण्यासाठी  1,25,000 रुपये लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लोकविकास बँकेचे अध्यक्ष व हिशोबाणीस यांना रंगेहात अटक केली.त्यांच्या ताब्यातून लाचेची रक्कम पथकाने जप्त केली आहे.
जगन्नाथ खंडेराव जाधव वय-70, आत्माराम संतराम पवार वय-52  असे अटक करण्यात आलेल्या बँकेचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचा हिशोबाणीस यांची नावे आहेत.

या बाबत अधिक माहिती आशी की, तक्रारदार यांचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकविकास नागरी सहकारी बँक मध्ये कर्जाची मंजुरी करण्यासाठी व कर्जाची उर्वरित रक्कम देण्यासाठी तक्रारदार यांच्या कडे एक लाख 15 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात तक्रार दिली.एसीबीच्या पथकाने तक्रारीची शहानिशा करीत राजश्री शाहू इन्स्टिट्यूट ऑफ म्यानेजमेंट कॉलेज येथे सापळा रचला असता लोकविकास बँकेचे अध्यक्ष  जे.के.जाधव  यांनी महाविद्यालयातिल हिशोबणीस पवार यांच्याकडे देण्याचे सांगितले पवार यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारतात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चवरिया, अप्पर अधीक्षक डॉ.अनिता जमादार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत यांच्या पथकाने केली.