औरंगाबाद- मराठवाडा विभागात कृषी विभागातर्फे राबविण्यात येणार्या विविध योजनांचा कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शुक्रवारी(ता.२३) रोजी आयोजित बैठकीत आढावा घेतला. दुष्काळ निवारण कामात हयगय केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कृषी आयुक्त
सचिंद्र प्रताप सिंह यांनी आज येथे अधिकार्यांची बैठक घेतली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर
मराठवाडा विभागात विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची अंमलबजावणी
करण्याचे आदेश यावेळी सिंह यांनी दिले. दुष्काळ निवारण कामात वेग आणण्याची गरज असून
कर्मचार्यांनी हयगय केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
चाराटंचाई पाणीटंचाई यासह वैयक्कि लाभाच्या योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्याची
आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. जिल्हा नियोजन अधिकारी पवार यांनी विविध योजनांसाठी
आवश्यक असलेल्या निधीची माहिती यावेळी दिली. यावेळी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम
भापकर, उपायुक्त
शिवानंद टाकसाळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, जिल्हा परिषदेचे
कृषी अधिकारी आनंद गंजेवार आदींची उपस्थिती होती.










