शक्य असेल तेवढ्याच व्यापार्‍यांना तपासणीला बोलवा

Foto
जिल्हा व्यापारी महासंघाची मागणी
एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यात दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी सर्व व्यापार्‍यांची शहरात ठीक-ठिकाणी कोरोनाची टेस्ट करण्यात येत आहेत. एकाच वेळी सर्व व्यापारी तपासणी केंद्रावर गर्दी करत असल्याने गोंधळ उडाला आहे. गेले चार -पाच दिवसांपासून गोंधळ होत असल्याने व्यापारी वर्ग त्रस्त झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने जेव्हढ्या टेस्ट करणे शक्य आहे. तेवढ्याच व्यापार्‍यांना तपासणीला बोलवावे. अशी मागणी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. 
तपासणीला आलेल्या व्यापार्‍यांना तासनतास ताटकळत थांबावे लागत आहे. यामुळे अनेकांची हाल होत आहे. अनेकजण तपासणीसाठी तासन्तास रांगेत उभे राहून कंटाळून घरी जात आहे. यामुळे अनेकांना हेलपाटे देखील मारावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येक तपासणी केंद्राने रोज किती व्यापार्‍यांच्या तपासण्या होऊ शकतात हे स्पष्ट करायला हवे. त्यामुळे जेव्हढ्या तपासण्या होऊ शकतात तेव्हढेच व्यापारी तपासणीला येतील. आणि व्यापार्‍यांची हाल देखील होणार नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आणि व्यापार्‍यांचे हाल होणार नाही असे नियोजन करण्यात यावे. अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाय योजना म्हणून व्यापार्‍यांची कोरोनाची तपासणी केली जात आहे. ही चांगली बाब आहे. परंतु दुसरीकडे तपासणी केंद्रावर गर्दी होत आहे. पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह सर्व व्यापारी तर एकाच रांगेत उभे आहेत. त्यामुळे कोरोनाचा आणखी धोका वाढू शकतो. त्यात तपासणी केंद्रावर जेवढ्या व्यापार्‍यांची तपासणी होऊ शकते. त्यांनाच तपासणीला बोलवावे. त्यामुळे व्यापार्‍यांना हेलपाटे मारावे लागणार आणि आणि गर्दी देखील कमी होईल. रोज केंद्रावर होणारा गोंधळ देखील कमी होईल. असे औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीनारायण राठी यांनी सांगितले.