मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा भक्तिभावाने - जयंत पाटील

Foto
औरंगाबाद :  राज्याचं मुख्यमंत्री उद्धव   ठाकरे  अयोध्याला  भक्तिभावाने  जात आहे. त्यात  राजकीय  हेतू  नाही  म्हणून  त्याचा  बाऊ  करू नये असा  सल्ला  राज्याचे  जलसंपदा  मंत्री  व  राज्य  राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष   जयंत  पाटील  यांनी  विरोधकांना  दिला. ते  औरंगाबादेत  राष्ट्रवादी पक्षाच्या  कार्यक्रम  साठी  आले  असता  पत्रकारांशी  बोलत  होते. औरंगाबाद  विमानतळाला  राजे  संभाजी  यांचे  ना  देण्यात  आले  त्याचा  शहरवासींनी  स्वागत  करावे. निवडणुका  आल्या  म्हणून  नामांतराचा  वाद  उफाडून  काढू   नय, आम्ही  विकासाच्या  मुद्द्यावर निवडणूक  लढणार  असल्याचे  ही ते  म्हणाले. राज्याचे  अर्थसंकल्प  समतोल  व  सर्व  घटकांना, समाजाला न्याय देणारा  आहे आहे. आम्ही पहिल्याच  अर्थसंकल्पात  विकासाला  चालना  देण्यासाठी यशस्वी  ठरलो  आहे. विरोधक  काहीतरी  विरोध  करायचं  म्हणून  बोलत  आहे. राज्याचा विकास  करावा  हा  आमचा  उद्देश  असल्याचे  ही ते  म्हणाले. मराठवाड्याचा  पाण्याचा  प्रश्नावर  विचारले  असता  कृष्णा  खोऱ्याचे पाणी  लवकरात  लवकर  या  भागात  कसं आणता  येईल  यासाठी  शासन  प्रयत्नशील  आहे. टप्प्या  टप्प्याने  आर्थिक  तरदूत  करून  प्रकल्प  पूर्ण करण्यात  येईल.  वाटरग्रीडचा  प्रश्न  वेगळा  असून  कोणताही  मोठा  प्रकल्प  हाती  घेण्या  अगोदर  तो  किती  यशस्वी  होऊ  शकतो  हे  पाहावे  लागते  फक्त  मोठ्या  घोषणा  करून  वायफड खर्च  करणे  राज्याच्या  हिताचे  नसल्याचे  ही ते  म्हणाले.