मध्यप्रदेशमधील काँग्रेस आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून सुरू असलेल्या कारवाईला हाणून पाडण्यासाठी नवी दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजप नेत्यासोबत असलेल्या या आमदारांना परत आपल्या गटात खेचण्यासाठी म.प.मधील मंत्र्यांनी अक्षरशः हंगामा केल्याचे वृत्त आहे.
भोपालच्या स्थानिक वर्तमानपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश भाजपचे काही वरिष्ठ नेते काँग्रेस आमदार बिसाहू लाल सिंह, हरदीप सिंह, अपक्ष आणि बीएसपीच्या आमदारांसोबत दिल्लीतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. सायंकाळी उशिरा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान दिल्लीत दाखल झाले. यामुळे भोपाळमध्ये कमलनाथ सरकार बेचैन झालं आणि एका राजकीय नाट्याच्या पहिल्या अंकाला सुरूवात झाली. काँग्रेस आणि इतर आमदारांना दिल्लीतून मानेसरच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हलवण्यात आलं. आपल्या खुर्चीला धोका असल्याचं जाणवल्यानं कमलनाथ यांनी आपल्या आमदारांच्या सोडवणुकीसाठीआपल्या चार मंत्र्यांना ताबडतोब दिल्लीला धाडलं. काँग्रेसचे मंत्री हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर आमदारांच्या सोडवणुकीसाठी जोरदार हंगामा झाला. त्यातच भाजप नेत्यांनी हॉटेलमध्ये पोलिसांनाही बोलावून घेतल्याचं समजतंय. त्यानंतर या नाट्यात काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांची एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं. दिग्विजय सिंहदेखील हॉटेलवर दाखल झाले. रात्री 2 वाजता भाजप आणि काँग्रेस दरम्यान झालेल्या या गोंधळात बीएसपी आमदार रमाबाई काँग्रेस नेत्यांसोबत निघून गेल्या. इतर हॉटेलमध्येच थांबले. हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर बिसाहू लाल सिंह आणि रमाबाई यांच्याशी संपर्क करण्यात आला, भाजपला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर रमाबाई आमच्यासोबत आल्या, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय. मध्य प्रदेशमधील राजकीय वातावरण तापले असून आपले 8 आमदार भाजपाने ओलीस ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपाने सुरू केलेल्या या राजकीय खेळीमुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी भाजपा आमदार खरेदी करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे हे आठ आमदार मंगळवारी मध्यरात्री हरयाणातल्या मानेसरमधल्या एका हॉटेल आले आहेत. या आठ आमदारांपैकी चार आमदारांनी कमलनाथ सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला आहे. तर एक काँग्रेस आमदार दिग्विजय सिंह गटातील आहे. पटवारी म्हणाले, आम्ही हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांच्या संपर्कात आहोत. मीदेखील त्याच हॉटेलमध्ये थांबलो आहे. बहुजन समाज पार्टीच्या आमदार रमाबाई माझ्यासोबतच आहेत. शिवराज सिंह चौहान यांना सत्तेची हाव आहे. त्यामुळेच सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्याकडून कटकारस्थाने आखली जात आहेत. मात्र यात ते यशस्वी होणार नाहीत. दरम्यान, आमदार रमाबाई मुलीच्या उपचारांसाठी दिल्लीला गेल्याची माहिती त्यांचे पती गोविंद सिंह यांनी दिली.