Corona:कोरोना रुग्ण विषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषदेचे मुद्दे

Foto

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. सध्याचे रुग्ण, संशयित रुग्ण आणि कोरोनाच्या चाचण्यासंदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. 


त्यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे-

  1. -कोरोनाचा मृत्यूदर सध्या कमी आहे, मात्र संसर्गदर जास्त आहे.
  2. महाराष्ट्रात कोरोनाचे ३२ रुग्ण, कुणाचीही प्रकृत गंभीर नाही
  3. १८ बाहेरुन संसर्ग होऊन आलेले आहेत, तर १४ जणांना त्यांच्यापासून संसर्ग झाला आहे 
  4. केंद्र तसेच राज्य सरकारने ठरवून दिलेल्या प्रयोगशाळांमध्येच कोरोनाची चाचणी करावी
  5. सध्या कोरोनाचे ७५ रुग्ण संशयित आहेत
  6. सात देशांमधून परतणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे
  7. रुग्ण पळून जाऊ नयेत म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे
  8. कुणीही घाबरुन जाऊ नका, काळजी घ्यावी.
  9. जे रुग्ण विलगीकरण मान्य करणार नाही, त्यांना स्थानबद्ध केलं जाणार
  10. कोरोनाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
  11. कोरोनाची नियमावली न पाळणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार
  12. रुग्णांना जेवण, टीव्ही, वायफाय सेवा देण्याचा प्रयत्न
  13. मुंबईच्या सेव्हन हिल्स भागात १ हजार बेडची व्यवस्था करणार
  14. कस्तुरबा गांधी रुग्णालयात १४५ बेडची व्यवस्था करणार
  15. मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबादमध्ये कोरोना तपासणी लॅब सुरु करणार
  16. गर्दी वाढू नये यासाठी जमावबंदीचे आदेश

कुणीही घाबरुन जाऊ नका, काळजी घ्यावी.