बैठकीत हिरो
ग्राउंडवर झिरो...!
उपचाराऐवजी व्यवस्थेवर उडवले कोट्यवधी !
कोरोना संसर्ग सुरू होताच आरोग्य यंत्रणेला कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीतून सर्वाधिक खर्च उपचार साहित्यावर होणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांनी क्वारंटाईन सेंटर उभारणीसाठी कोट्यवधींचा खर्च केला. परिणामी फ्रन्टलाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीटी किट, दर्जेदार हॅन्ड ग्लोज, मास्कही मिळाले नाहीत. बैठकीत हिरो ठरलेले अनेक अधिकारी ग्राउंडवर मात्र झिरो होते. शहरात कोरोनाने दस्तक दिल्यानंतर आरोग्य यंत्रणेसाठी पहिल्या टप्प्यात पन्नास कोटींचा निधी देण्यात आला. या निधीतून आवश्यक यंत्रसामुग्री, कर्मचाऱ्यांसाठी लागणारे किट, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, मास्क अधिक अत्यावश्यक वस्तूंची खरेदी व्हायला हवी होती. मात्र अधिकाऱ्यांनी शहरात कारण क्वारंटाईन सेंटर उभारणीवर भर दिला. गंमत म्हणजे शहरात उभारले गेलेले आठ ते दहा सेंटर तब्बल महिनाभर शोभेची वस्तू बनले होते. कलाग्राम सारख्या विस्तीर्ण आवारात बनवलेल्या क्वारान्टीन सेंटरमध्ये पाच दहा संशयित कॅरम बोर्ड आणि पत्त्याचा डाव मांडून बसले होते. तर इतर सेंटर ओस पडली होती. आरोग्य यंत्रणेने क्वारान्टीन करण्यावर भरच दिला नाही. नको ती ब्याद म्हणून संशयितांना वाऱ्यावर सोडले. पॉझिटिव रुग्णांच्या कुटुंबियांचेही स्वॅब घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. इतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची तर गोष्टच वेगळी. आमचे स्वब घ्या म्हणून रोज संशयित रुग्ण घाटी तसेच जिल्हा रुग्णालयाच्या खेटा मारत असल्याचे विदारक चित्र शहरवासीयांनी पाहिले. पॉझिटिव्ह रुग्णांसोबत संशयितांची वाहतूक, संपर्कात आलेल्यांना क्वारान्टीन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले नाही. पॉझिटिव रुग्णांना वेळीच रुग्णालयात भरती न करणे अशा काही अक्षम्य चुकांनी शहर संसर्गाच्या गर्तेत ढकलले गेले. दुसरीकडे योग्य खबरदारी न घेतल्याने रुग्णालये संसर्गाचा अड्डा बनली. निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टंसिंग, दर्जेदार मास्कचा अभाव यामुळे अनेक डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला.
गारखेडा परिसरातील राहणाऱ्या एका कुटुंबातील कर्त्या पुरुषाला करूना ची लक्षणे आढळली आरोग्य यंत्रणेने त्या इसमाचा स्वब घेतला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयात हलवले मात्र घरातील इतरांची स्वॅप घेतले नाही चार-पाच दिवसांनी पत्नीचा घेतला मात्र मुलांचे स्वॅब घेतलेच नाही पत्नी पॉझिटिव्ह निघाली चार-पाच दिवसानंतर एक मुलगा मात्र ताप फणफणला तरी ही यंत्रणा जागी झाली नाही अखेर एका वजनदार राजकीय नेत्या ज्या कानावर ही घटना आली आल्यानंतर त्यांनी आरोग्य यंत्रणेला फोनाफोनी करत कुटुंबावर उपचार करण्याचे फर्मान सोडले
केंद्रेकर संतप्त, म्हणाले यू स्टूपिड !
कोरोना शहरात येऊच देणार नाही अशा अति आत्मविश्वासाच्या वल्गना एक जबाबदार आरोग्य अधिकारी पत्रकारांशी बोलताना करीत. आरोग्य यंत्रणा किती उत्कृष्ट काम करीत आहे याचे दाखले देत बैठकीत हिरो ठरत होते. स्वकर्तुत्वाच्या मोठ मोठ्या बातम्या, मुलाखती माध्यमांमध्ये झळकवण्यात अग्रेसर असलेले हे अधिकारी ग्राउंड वर मात्र झिरो होते. विभागीय आयुक्तांनी मात्र भर बैठकी त्यांचा फुगा फोडला. यू स्टूपिड, डोके ठिकाणावर ठेवा असा सज्जड दमच आयुक्तांनी या अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.