कोरोना सर्वसामान्यांसाठी दुःख दायी...कैद्यांसाठी मात्र आनंददायी

Foto

डॉक्टर साहेब, मला बी पॉझिटिव्ह करा !
कैद्यांच्या पलायनाची नवी वाट ....!

 कोरोना महामारी जेलमधील कैद्यांसाठी संधी बनू लागली असून कोरोना झाल्याचे निमित्त साधून आतापर्यंत तीन आरोपींनी धूम ठोकली आहे. पॉझिटिव्ह होण्याचा हा नामी उपाय तर आरोपींनी शोधून काढला नाही ना? असा सवाल आता उपस्थित होत आहे.  गेल्या महिनाभरापासून या ना त्या कारणाने हर्सूल जेल चर्चेत आहे. या जेल मधील एकाच वेळी ३२ कैदी कोरणा पॉझिटिव निघाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर प्रशासनाने दक्षता घेत संपर्कातील कैद्यांची तपासणी करून त्यांना वेगळे केले. किलेअर्क परिसरात कोविड सेंटर उभारून संशयित कैद्यांची रवानगी केली. सात जूनच्या रात्री अक्रमखान अय्यज खान आणि सय्यद सैफ सय्यद हसन या दोन कैद्यांनी खिडकीचे गज वाकवून बेडशीट च्या साह्याने धूम ठोकली.गंभीरा आरोपातील एक कैदी अद्याप फरारच आहे. त्यानंतर आता पुन्हा इमरान बेग या खून प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने अठरा जून च्या सकाळी घाटीतून पलायन केले. हा कैदी ही  पॉझिटिव्ह होता. गंभीर गुन्ह्यातील कैदी अशाप्रकारे फरार होऊ लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण परागंदा होण्यातही संशय व्यक्त केला जात आहे. एकंदरीत या घटनांनी कारागृह प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचा कारभार चर्चेत आला आहे. यापूर्वीच्या काही घटनांवर नजर टाकली तर कैद्याला घाटीत दाखल करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा कार्यरत असते.  आजार झाल्याचे झाल्याच्या प्रमाणपत्रा पासून ते घाटीत सोयीसुविधा पुरवण्या पर्यंतचे जाळे घट्ट विणले गेले आहे. यात असंख्य हात कार्यरत आहेत. आता तर कोरोना महामारीची परिस्थिती त्यांच्यासाठी संधी म्हणूनच चालून आली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ही साखळी कार्यरत झाल्याचे बोलले जाते. कुख्यात गुन्हेगार आणि त्यांचे हस्तक सक्रिय झाले आहेत. या काळात सुरक्षाव्यवस्थेत होणाऱ्या चुका हेरून कैदी परागंदा होत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोना से मरता है क्या ? भाग तो शकते है ! हे डायलॉग सारे काही सांगून जातात. सूत्रांच्या माहितीनुसार पॉझिटिव कैदी फरार झाल्याच्या प्रकरणानंतर कैद्यांना आता ही नवी वाट सुचली आहे.कोरोना से मरता है क्या ? भाग तो शकते है ! असे संवाद सुरक्षा यंत्रणेने पुढे नवे आव्हान उभे करणारेच आहेत.