47 हजार अँटीजन टेस्ट स 50 वर्षावरील नागरीकांचा सर्व्हे
शहरा पाठोपाठ आता कोरोना संसर्गाने ग्रामीण भागात चांगलेच हातपाय पसरले असून जिल्ह्यातील तब्बल 563 गावांना विळखा घातला आहे. संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार आता विना मास्क फिरणार्यांना दंड मोहीम जोरात सुरू करण्यात आली आहे.
अँटीजन टेस्ट मुळे शहरात संपर्क साखळी तोडण्यात महानगरपालिकेला बर्यापैकी यश आले होते. आठवडाभरापूर्वी संसर्गाचा आकडा 150 येऊन ठेपला होता. मात्र गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाची लागण मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. गंगापूर तालुका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असून त्याखालोखाल वैजापूर आणि पैठण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत आहे. जिल्ह्यातील 1368 गावांपैकी सध्या 563 गावांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत.
पन्नास वर्षा वरील प्रत्येक व्यक्तीची टेस्ट
दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील 50 पेक्षा अधिक वय असणार्याचा सर्वे करण्यात येणार आहे. त्याच बरोबर खत बियाणे विक्रेते, बँक अधिकारी कर्मचारी यांच्यासह किराणा तसेच भाजीपाला विक्रेते यांची अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे. पॉझिटिव रुग्णाची संपर्क साधत शोधण्यावर आरोग्य यंत्रणा भर दिला आहे.
कोविड केअर सेंटर त्याचबरोबर ऑक्सिजन बेडची व्यवस्था पुरेशी केली आहे. रुग्णांची ने- आण करण्यासाठी 11 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तब्बल 47 हजार अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत.
-डॉ. उल्हास गंडाळ,
जिल्हा वैद्यकीय अधिकारी