महापालिकेतील आणखी एका अधिकार्याला कोरोना
महापालिकेतील आणखी एका अधिकार्याला कोरोनाची बाधा झाली आहे. वॉर्ड अभियंता असलेल्या या अधिकार्याचा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. महापालिकेचा आरोग्य विभाग, वॉर्ड कार्यालयातील अधिकारी, पाणी पुरवठा विभागातील अधिकारी, सफाई विभागातील अनेक कर्मचार्यांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झालेली आहे तर स्मशानाजोगी असलेल्या पितापुत्रांचा मृत्यूही झाला आहे.