संचारबंदी अन टवाळखोराला एअरगनची धुंदी !!

Foto

संचारबंदीतही एअर गन आणि बेसबॉल ची धुंदी चढलेल्या एका टवाळखोराला पोलिसांनी सेव्हन हिल पॉइंटवर पकडले.

 अमजद पठाण असे त्या तरुणाने आपले नाव पोलिसांना सांगितले.

 शहरात सध्या कडेकोट संचारबंदी असताना संध्याकाळ च्या सुमारास सेवनहिल परिसरात एक टवाळखोर खुलेआम फिरत असल्याचे दिसून आले.नाकाबंदी पॉईंट वरील पोलीसांनी बाहेर का फिरतो असे जाब विचारला असता त्याने पोलिसांना अरेरावीची भाषा केली. झडती घेतली असता त्याच्याजवळ एक बेसबॉल स्टिक आणि एअरगण बांदोबस्तावरील पोलिसांना सापडल्याची माहिती बंदोबस्तावरील पोलीस सूत्रानुसार मिळाली. नाकाबंदी वरील पोलिसांनी अमजदची विडिओ शूटिंग देखील केली.तो  नशेत होता असे उपस्थित पोलिसांनी सांगितले. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत.