औरंगाबाद : एन - ३ , पारिजात नगरमधील तब्बल ८० फूट खोल अशा विहिरीत पडलेल्या छोट्याशा पिल्लाला मनपाच्या अग्निशामक विभागाने काल ( दि. १३ फेब्रुवारी रोजी) जीवावर खेळत वाचवले. मनपा कडे यंत्रणा असल्यास एक पिल्लुदेखील वाचवले जाऊ शकते याचीच प्रचिती यानिमित्ताने आली. विभागातील नागरिकांकडून व सर्वच स्तरावर त्यांच्या कामाची प्रशंसा होत आहे.
वॉर्ड क्र. ७६ एन - ३ ,सिडको पारिजात नगर येथील हायकोर्ट सोसायटीजवळ ५० फूट व्यास असलेली जुनी विहीर आहे . मनपाच्या दुर्लक्षामुळे येथे कोणतेही सुरक्षा भिंत नाही. विहिरीत घाण पाण्याबरोबरच डासांचा प्रादूर्भाव देखील आहे. विहिरीत कचरा टाकला जातो त्यामुळे आसपास दुर्गंधीचे वातावरण आहे. मागे २ वर्षांपूर्वी देखील या विहिरीत मोठे कुत्रे पडले होते त्यावेळीही अग्निशामक यंत्रणेने ते वाचविले होते.
सदर कुत्र्याचे पिल्लू १२ मार्च रोजी सकाळ पासून या भयंकर विहिरीत पडले होते, पिल्लाची आई ते खाली पडल्यामुळे ओरडत होती,
याठिकाणी राहणारे सागर शिंदे यांनी समाजसेवक राहुल इंगळे यांना फोन केला .व त्यांनीच मनपा अग्निशामक विभागाला कळविले. रात्री उशिर झाल्याने अग्निशामक विभागाला पिल्लू काढण्यास यश मिळाले नाही.येथील लहान मुले, महिला,तसेच नागरिक यांनी पिल्लविषयी हळहळ व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पिल्लाला बाहेर काढण्यात यश मिळाले.
या मुक्या जीवाला वाचवण्यासाठी मनपा अग्निशामक दलाचे ड्युटी इन्चार्ज वैभव बाकडे,फायरमन सोमनाथ भोसले,अशोक वेलदोडे,दिनेश बकले, दिनेश वेलदोडे,योगेश दुबे,आकाश नेहरकर यांनी मोलाची कामगिरी बजावली.आणि विशेष म्हणजे विहिरीत उतरुन पद्माकर बकले यांनी जीवावर खेळून पिल्लाला बाहेर काढले.
जीवंत प्राण्यांची सुरक्षा आवश्यक आहे. या शहरातील खूप विहिरी आहेत ज्या अत्यंत भयंकर अवस्थेत आहेत त्यांना सुरक्षा कठडे नाहीत त्यावर लोखंडी जाळ्या नाहीत.त्यामुळे असे अपघात होतात.त्याहूनही महत्वाचे या विहिरींचे पुनरुज्जीवन केले तर सध्याचा तरी त्या भागातील पाणी प्रश्न सुटू शकतो. पण याकडे मनपाचे दुर्लक्ष झालेले आहे.आयुक्तांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
- राहुल इंगळे , समाजसेवक