दीपिका,श्रद्धा, साराची चौकशी सुरू

Foto
अभिनेत्री दीपिका पदुकोण पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणसोबत श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचंदेखील नाव समोर आले आहे. त्यामुळे आज या तिघींची एनसीबी चौकशी करणार आहे.
ड्रग्जप्रकरणी श्रद्धा कपूरचे नाव आल्यामुळे बुधवारी तिला एनसीबीने समन्स बजावले होते. त्यानंतर शनिवारी ( 26 सप्टेंबर) ती चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली होती.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker