जनता कर्फ्यु दरम्यान घाऊक औषध विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवावे जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे आवाहन

Foto
 १० ते १८ जुलै दरम्यान घाषित जनता कर्फ्यु यामध्ये जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशच्या वतीने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व घाऊक औषध विक्रेत्यांना आपली दुकाने बंद ठेवावीत. असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. 

कोरोना आजाराची साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्व
पातळीवर प्रयत्न चालू आहेत. औरंगाबाद शहर व परिसरात वाढता प्रादुर्भाव व रुग्णसंख्येतील वाढ थांबविण्यासाठी १० ते १८ जुलै २०२० दरम्यान लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच औषध
विक्रीची दुकाने बंद असतील तर किरकोळ कारणांसाठी बाहेर पडणा-या लोकांचा वावर थांबू शकतो. व
साथ आटोक्यात आणण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. या सदंर्भात प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन कडे विचारणा करण्यात आली होती. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त व सर्व पक्षीय लोकप्रतिनीधी या संदर्भात संघटनेचे पदाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली. शहरातील
लोकप्रतिनीधीसोबत विचार विनीमय करण्यात आला.
केमिस्ट संघटनेकडून प्रशासनास नेहमीचं सहकार्याची भूमिका राहिली आहे. त्यानुसार अशा कठीण
परिस्थितीमध्ये व्यापक जनहित लक्षात घेता लॉकडाऊनमध्ये सहभागी होणार असल्याचा निर्णय
घेण्यात आला. गंभीर आजार व तातडीची गरज असणारे रुग्ण यांची गैरसोय होऊ नये म्हणून संघटनेने औरंगाबाद
शहरातील निवडक रुग्णालयाचे व रुग्णालयातील औषधी दुकाने या काळात पूर्णवेळ सेवा
देतील. त्याशिवाय काही अडचण असल्यास संघटना औषधे उपलब्ध करुन देईल यासाठी प्रयत्नशील असेल. असे आश्वासन यावेळी देण्यात आले. मधुमेह व रक्तदाब, थॉयरॉईड व इतर नियमित लागणारी औषधी पुढील दहा दिवसांची खरेदी ठेवावीत. व आपली गैरसोय टाळावी व प्रशासनास सहकार्य करावे. तसेच १० ते १८ जुलै दरम्यान घोषित जनता कर्फ्युमध्ये सर्व किरकोळ व इतर औषध विक्रेते यांनी आपली दुकाने उघडू नये. असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर व सचिव विनोद लोहाडे यांच्यासह केमिस्ट अॅण्ड सर्व ड्रगिस्ट असोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष चंद्रशेखर गाडे, जिल्हा सचिव विनोद लोहाडे, कोषाध्यक्ष निखिल सारडा, उपाध्यक्ष शैलेंद्र रावत, सहसचिव नितीन दांडगे, सागर पाटील, कार्यकारिणी सदस्य कपिल टिबडीवाला, किरण जोशी, सुनिल देशमुख, मनोहर कोरे, बाबुराव सोनवणे, रईस खान, प्रभुगिरी, पवनचंद सिंगीसह आदींच्या वतीने करण्यात आले. 
हे औषधीची दुकाने २४ तास चालू राहातील
संचारबंदीच्या काळात कमल नयन बजाज हॉस्पीटल- सातारा परिसर, बीड बायपास रोड, सिग्मा हॉस्पीटल शहानूरमिया दर्गा जवळ, हेडगेवार हॉस्पीटल- शहानूरमिया दर्गा जवळ, हेडगेवार हॉस्पीटल-जवाहर कॉलनी, गजानन मंदीर , गारखेडा परिसर, धूत हॉस्पीटल- रामनगर, जालना रोड, वाय एस के हॉस्पीटल-टाऊन सेंटर, सिडको, एम जी एम हॉस्पीटल-
टाऊन सेंटर, सिडको, जे जे प्लस-अदालत रोड, माणिक हॉस्पीटल-जवाहर कॉलनी पोलिस स्टेशन जवळ, आयकॉन हॉस्पीटल- गणेश कॉलनी, सहारा हॉस्पीटल-एमजीएम समोर, हायटेक आधार- समता नगर, क्रांतीचौक पोलिस स्टेशन समोर, एमआयटी-एन ३-सिडको, अॅपेक्स हॉस्पीटल - बसय्येनगर एसएफएस शाळेसमोर, जालना, एम्स हॉस्पीटल- हडको, ओरिअन सिटीकेअर-कलश मंगल कार्यालय न्यु उस्मानपुरा क्रांतीचौक, बेबंडे हॉस्पीटल- बीड बायपास, शांती नर्सिग होम-कांचनवाडी, केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल महेशनगर या ठिकाणचे मेडिकल चालू राहतील.