डॉ. कल्याण काळे यांनी दोन वेळेस फुलंब्री मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात एक सयंमी आणि हुशार नेता अशी त्यांची ओळख आहे. अमोघ वक्तृत्वा वरदान लाभलेल्या डॉ. कल्याण काळे यांना विकासाचीही दृष्टी आहे. युवकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या डॉ. काळे यांच्या नियुक्तीमुळे पक्षाला जिल्ह्यात नवी ओळख आणि चांगला प्रतिसादही मिळण्याची राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. काळे यांच्या निमित्ताने काँग्रेसला खूप वर्षानंतर जनाधार असलेला नेता अध्यक्ष म्हणून लाभला आहे.
डॉ. कल्याण काळे यांच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आणि काँग्रेस पक्ष औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बळकट होईल. अशी अपेक्षा आहे. डॉ.कल्याण काळे यांच्या नियुक्तीमुळे सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हा वातावरण निर्माण झालेले आहे. डॉ. कल्याण काळे यांच्या निवडीबद्दल गणेश पवार, सुरेश शिंदे, प्रभू कोंडके, केदार पडुळ, दामोधर भालेराव, समद खान, अफजल शेख, संदीप ढोके, सुनील हिवराळे, गंगा ढोके, फेरोज बागवान, शिवा पडुळ, नारायण चाळगे,कृष्णा पवार, चंपालाल बैनाडे,सर्जेराव पाटील, शेख युनूस, अर्जुन शेळके, राजू शेळके, नदीम शेख, चक्रधर पवार, भगवान साळवे, आयुब कुरेशी, आदींसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी डॉ कल्याण काळे यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. काळे यांच्या बरोबरच शहराध्यक्षपदी महंमद उस्मानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नामदेव पवार यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी औरंगाबाद सह लातूर जिल्हा व शहर, ठाणे, भंडारा, चंद्रपूर येथील अध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे.