संपूर्ण शहरात तुंबलेले ड्रेनेज, नाल्यांची अर्धवट कामे, त्यातच वाहणारे ड्रेनेजचे पाणी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या कामात व्यस्त प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे.मागे पावसाळ्याच्या तोंडावर मनपाद्वारे नाल्यांच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले होते.आता पुन्हा एकदा या समस्येने डोके वर काढले आहे.शहरातील बुढीलेन, बेगमपुरा, सिल्लेखाना, हिलाल कॉलनी, नारळीबाग,औरंगपुरा ,जुना मोंढा अशा अनेक भागांमध्ये नेहमीच ड्रेनेज लाईन चोकअप होण्याचे प्रकार घडतात.
एन-4 सिडको, जयभवानी नगर भागातुन वाहत असलेल्या नाल्यातून सतत 1 महिन्यापासून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे.यामुळे जवळपास राहणार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.वॉर्ड उपअभियंता ते प्रशासक यांच्यापर्यंत अर्ज करूनही आजपर्यंत काम झालेले नाही.उच्चभ्रू वसाहत असलेल्या या भागातील नागरिक कर भरूनही मुख्य सेवा सुविधांपासून वंचित आहेत.