मध्यप्रदेशमध्ये 'मामा'जींची जादू ओसरली, काँग्रेस बहुमताने विजयी होणार; एक्झिट पोलचे निष्कर्ष

Foto

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले आहे. पाचही राज्यांचे निकाल मंगळवारी ११ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी आलेल्या एक्झिट पोलनुसार मध्यप्रदेशात काँग्रेस विजयी होत असल्याचे 'एबीपी माझा'च्या पोलमध्ये म्हटले आहे. टाइम्स नाऊ, रिपब्लिक टीव्ही, इंडिया न्यूज आणि इंडिया टुडेने मात्र भाजप बहुमतापेक्षा खुप पुढे असल्याचेे दाखवले आहेे. २०१९ लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या पाच राज्यांच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी येथे पूर्ण वेळ देत एकमेकांवर आरोप प्रत्यारोपच्या फैरी झाडल्या. मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, हे मंगळवारी स्पष्ट होईल मात्र भाजपच्या ताब्यात असलेल्या मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या विधानसभा निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे.

 

मामाजींची जादू ओसरली 

मध्यप्रदेशमध्ये शिवराजसिंह यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे. राज्यातील महिलांचा भाऊ आणि तरुणांचा मामा असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांना जनतेने यावेळी नाकारल्याचे चित्र एक्झिट पोलमधून समोर येताना दिसत आहे. काँग्रेसचे तरुण नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पाठीशी मध्यप्रदेशची जनता उभी राहिले असल्याचे चित्र दिसत आहे. २३० सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत ११६ हा जादूई आकडा गाठताना काँग्रेस दिसत आहे. एबीपी माझाच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस तीन डिजिटमध्ये आहे तर भाजप नव्वदीही पार करताना दिसत नाही. अपक्ष आणि इतरांच्या खात्यात १० जागांना जात असल्याचे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. मध्यप्रदेशातील सर्वात मोठा व्यापम घोटाळा हा मामाजींसाठी घात ठरला असण्याची शक्यता आहे.

 

मध्यप्रदेश २३० जागा

बहुमताचा आकडा – ११६

एक्झिट पोलची आकडेवारी

भाजप – ०९४

काँग्रेस – १२६

इतर –   १०


राजस्थाना – २०० जागा

बहुमताचा आकडा – १०१

आजतक एक्झिट पोल

काँग्रेस –  ११९ ते १४१

भाजप –  ५५ ते ७२


इंडिया टुडे आणि एक्सिस एक्झिट पोल

काँग्रेस – ३५

भाजप – ४६

जोगी+मायावती – ०७