बापाचा मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
स्वयंपाक घरात झोपलेल्या पोटच्या 19 वर्षीय मुलीवर बापानेच बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना वाळूज औद्योगिक नगरीत घडली या प्रकरणी नराधम बापा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष भास्कर साळवे असे आरोपीचे नाव आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 2 तारखेच्या मध्यरात्री पीडित तरुणी ही स्वयंपाक घरात एकटी झोपलेली होती त्यावेळी आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तरुणीने आरडाओरड केल्याने तिची अब्रू वाचली तरुणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फड करीत आहेत