कोरोना सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या महिला प्राध्यापिकेच्या कामात अडथळा आणल्यावरून यूट्यूब च्या कथित तीन ते चार पत्रकारांवर आज जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कैसर कॉलनी भागात हा प्रकार घडला. सध्या शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे.खबरदारीचा उपाय म्हणून मनपाच्या वतीने ५० वर्षा पुढील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू आहे.त्या कामासाठी काही प्राध्यापक ,शिक्षक यांची मदत घेण्यात येत आहे.हे शिक्षक गल्लोगल्ली जाऊन स्वतःच जोव धोक्यात घालून ५० वर्षावरील नागरिकांची माहिती गोळा करीत आहेत. या साठी शहरातील कैसार कॉलोनी भागात एक महिला प्राध्यापिका पथकासह माहिती गोळा करीत असताना तीन ते चार व्यक्ती तेथे आले. तुम्ही का माहिती गोळा करीत आहात, तुम्हाला कोणी आदेश दिले असे धमकी वजा प्रश्न विचारत त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. तसेच त्या महिला कर्मचाऱ्याची व्हिडिओ चित्रफिती घेत ती युट्युबवर मीडियाच्या नावाने प्रसारित केली. सदर माहिती कर्तव्यावरील प्राध्यापिकेने मनपा अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर वरिष्ठांनी तातडीने जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या तक्रारीवरून तीन ते चार कथित युट्युब पत्रकारा म्हणविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री पर्यंत सुरू होती.