देसरडाच्या मदमस्त सत्तेवर पहिला घाव! बोगस बनवलेले चेंबर तोडले

Foto
’आ. सावे यांच्या दणक्यानंतर पेवर ब्लॉक वापरून बनवलेले बोगस चेंबर अखेर उखडून टाकण्यात आले. कालच सावे यांनी धाव घेत नागरिकांचे गार्‍हाणे ऐकले पण बोगस चेंबरचे बांधकाम काढण्याच्या सूचना केल्या होत्या.
चिस्तिया चौक ते एमजीएम सिमेंट रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्यावर ड्रेनेज चेंबरमध्ये पेवर ब्लॉक वापरून काम सुरू होते. नागरिकांनी हे काम बंद पाडले. आमदार सावे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी कंत्राटदाराची चांगलीच हजेरी घेतली. आज अखेर पेवर ब्लॉक काढून विटांचे बांधकाम करण्यात आले.
 ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’  या चित्रपटातील डायलॉग आठवतो का ! अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला दिनकर भोसले म्हणतो, आता बघूच कोण जिंकते ते...मदमस्त सत्ता...की पेटलेली जनता ! गेली वीस वर्ष पक्षाला बटिक बनवून कुटुंबातच उमेदवारी लाटणार्‍या प्रशांत देसरडाच्या मदमस्त सत्तेवर आज पहिला घाव पडला. पेवर ब्लॉक वापरून बनवलेले बोगस चेंबर उखडून टाकण्यात आले. सत्तेचा माज चढलेल्याची गुर्मी जनता कशी उतरवते, याचे हे उदाहरण ! आता देसरडाची उलटी गिनती सुरू झाल्याची प्रतिक्रिया सुरानानगर टाऊन सेंटर परिसरात उमटत आहे.
गेल्या वीस वर्षांपासून सुराना नगर वॉर्डाचा सम्राट बनलेल्या प्रशांत देसरडाने कंत्राटदाराशी हातमिळवणी करीत बोगस कामांचा धडाका लावला. वीस वर्षाच्या सत्तेची मस्ती आणि गुंडगिरीच्या जोरावर देसरडा व त्याची पिलावळ जनतेला त्रास देऊ लागली. कचरा, रस्ते, पाणी अशा समस्या घेऊन गेलेल्या नागरिकांना देसरडाने त्याच्या दरबारातून अपमानित करून पाठवले. एका निवृत्त मुख्याध्यापिकेला शंभर लोकांसमोर चल निघ इथून अशी म्हणण्याची मस्ती त्याला चढली होती. ही नशा कधी एकदा उतरते याचीच वाट सुराना नगरवासिय पाहत होते. अखेर देसरडाच्या गैरकारभारावर काल पहिला घाव बसला. नागरिकांनी जन आंदोलन करत देसरडा विरुद्ध दंड थोपटले. भाजप वरिष्ठांपर्यंत तक्रारी गेल्याने देसरडा बिळात लपला.  अखेर आमदार अतुल सावे यांनी धाव घेत नागरिकांचे गार्‍हाणे ऐकले पण बोगस चेंबर चे बांधकाम काढायला लावले.
सगळे सर्टिफिकेट त्याच्या खिशात!
दरम्यान, सुराना नगर वार्डात आरक्षण कोणतेही असो देसरडा त्यासाठी पात्र ठरतो. ओबीसी प्रवर्गाचे सर्टिफिकेट त्याच्या खिशात आहे. महिला साठी सुटलेल्या वार्डात पत्नी लाभ घेते. ओपन पुरुष असेल तर देसरडा स्वतः उभा राहतो. अशा प्रकारे गेल्या चार टर्म पासून देसरडा या वॉर्डाचा एकमेव उमेदवार ठरतो आहे. लोक आता भारतीय जनता पार्टीकडे संशयाने पाहत आहेत. देसरडाने पार्टीला बटिक बनवले का?  असा सवाल विचारत कार्यकर्ते आम्ही सतरंज्या उचलण्याच्या काम करावे का, असेही बोलू लागले आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker