संचार बंदीच्या काळात शहरात चालणाऱ्या गैर कारभाराचा आता मनपा आयुक्तच पर्दाफाश करीत आहेत. संजयनगर- मुकुंदवाडी परिसरात खुलेआम मास विक्री करणाऱ्या दोघांवर आयुक्तांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले. त्यामुळे पोलिसांसह मनपा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संचारबंदीच्या काळात मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय फिरस्तीवर आहेत. आज मुकुंदवाडी याठिकाणी आयुक्त पाहणीवर गेले असता छुप्या पद्धतीने मासविक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
मुकुंदवाडी येथे आज (दि.१३ जुलै) संचारबंदीची पाहणी करण्यासाठी आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय आले होते. त्यावेळी संजयनगर मुकुंदवाडी येथील निसार कुरेशी व सायरा शाफिक कुरेशी हे जनता कर्फ्यु काळात मांस विक्रीला बंदी असताना अवैधरित्या चिकन मास विक्री करताना आढळून आले.आयुक्तांनी लगेचच संचारबंदीचे उल्लंघन करणे व अवैधरित्या चिकन मांस विक्री करणे बाबत गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले .यानुसार मनपाचे अवैध कत्तल विरोधी पथक प्रमुखांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या २ व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे .यानुसार मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे .











