दुपारनंतर कोरोनाचे २५ रुग्ण वाढले

Foto
जिल्ह्यात दुपारनंतर आणखी २५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ही १२१५१ वर जाऊन पोहचली आहे. 

जिल्ह्यातील १२१५१ कोरोनाबाधीतांपैकी आतापर्यंत ६६९० जण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत ४२३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर सध्या ५०३८ जणांवर उपचार सुरु आहेत. 
शहरात २० रुग्ण वाढले
दुपारनंतर शहरात २० रुग्ण वाढले. त्यात पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर २, टीव्ही सेंटर १, कासलीवाल गार्डन, मुकुंदवाडी १, मामा चौक १, अशोकनगर, मयूर पार्क १, एन बारा हडको ३, हर्सुल टी पॉइंट १, एसआरपीएफ परिसर १० या भागात रुग्ण आढळून आले आहेत. 
ग्रामीण भागात ५ रुग्ण
ग्रामीण भागात ५ रुग्ण आढळून आले. त्यात 
गंगापूर १, पिशोर रोड, कन्नड २, फुलंब्री १, सिल्लोड १ या भागात रुग्ण आढळून आले आहेत.
सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत रामनगरातील ३२ वर्षीय पुरूष, सिडको मुकुंदवाडीतील ५५ वर्षीय पुरूष, विविध खासगी रुग्णालयांत सेव्हन हिल परिसरातील ५६ वर्षीय पुरूष, पैठण गेट येथील ५५ वर्षीय स्त्री, मित्र नगरातील ६२ वर्षीय स्त्री, मिसरवाडीतील ४०वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.