पहिल्या टप्प्यात आज कोरोना @ ११३ रुग्ण

Foto
औरंगाबाद जिल्ह्यात आज ११३ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८५७७ झाली आहे. 

आज आलेल्या अहवालानुसार ८५७७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५०६१ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३५४ जणांचा मृत्यू झाला. तर ३१६२ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये नऊ रुग्णांचा अहवाल सिटी एंट्री पॉइंट येथे अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत पॉझिटिव्ह आला आहे. 
शहरातील १०२ रुग्ण
शहरात आज पहिल्या टप्प्यात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये रमानगर १, सादातनगर, रेल्वे स्टेशन परिसर २, भावसिंगपुरा १, मयूरपार्क ५, कँटोंमेट जनरल हॉस्पीटल परिसर १, छावणी १, पदमपुरा ३, एकनाथनगर ३, शिवशंकर कॉलनी ८, ज्ञानेश्वर कॉलनी १, भानुदासनगर, आकाशवाणी परिसर १, मित्रनगर ४, उत्तरानगरी, धूत हॉस्पीटलमागे १, अंगुरीबाग १, अरिहंतनगर १, एन सहा सिडको ४, एन चार सिडको १, सेव्हन हिल २, गजानन कॉलनी १, जाधववाडी १, तिरूपती कॉलनी १, विष्णूनगर ४, आयोध्यानगरी २, कांचनवाडी १, चिकलठाणा ३, विवेकानंदनगर, एन बारा हडको १, कोहिनूर गल्ली रोड १, एन नऊ पवननगर १, एन सात, सिडको १, जयभवानीनगर १, देवळाई चौक, बीड बायपास १, रेणुकानगर, शिवाजीनगर १०, गुरूप्रसाद नगर, बीड बायपास १, जालाननगर १, एसआरपीएफ कॅम्प, सातारा १, जय नगरी, बीड बायपास ३, आयोध्यानगर १३, श्रीकृष्णनगर २, रायगडनगर १, नारेगाव १, नक्षत्रपार्क नक्षत्रवाडी २, उस्मानपुरा १, बजाजनगर ३, अमेर नगर, बीड बायपास १, सातारा परिसर १, गारखेडा १ या भागातील रुग्ण आढळून आले आहे.
ग्रामीण भागातील ११ रुग्ण
ग्रामीण भागातील ११ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात लोनवाडी, सिल्लोड १, दहेगाव, वैजापूर १, वडगाव कोल्हाटी १, गांधीनगर, रांजणगाव १, पांडुरंग सोसायटी बजाजनगर १, अरब मोहल्ला, अजिंठा १, हनुमाननगर, अजिंठा १, रेणुकानगर, अजिंठा २, तेलीपुरा गल्ली १, मातोश्रीनगर, रांजणगाव १ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.