पाऊस तारी अन् पाऊसच मारी

Foto

सततच्या पावसाने खरीप पिके धोक्यात

 मूग, उडीद, मका पिकांवर मर रोगाचाही प्रादुर्भाव

: वेळेत झालेली खरीप पिकांची पेरणी अन चांगल्या पावसाने बहरलेली पिके या जमेच्या बाजू असतानाही पुन्हा एकदा मराठवाड्यावर अतिवृष्टीचे संकट घोंगावत आहे. औरंगाबाद, जालना, बीड आणि हिंगोली या पाच जिल्ह्यानी पावसाने सरासरी ओलांडली असून नांदेड, उस्मानाबाद आणि  लातूर या तीन जिल्ह्यात मात्र अद्यापही सरासरीएवढा पाऊस पडलेला नाही.  सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेले मूग- उडीद या सारखी कडधान्य पिके हातची जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मका कपाशी यासारखी पिकेही  पिवळी पडू लागली आहेत.
यंदा मराठवाड्यात 1 जून रोजी वरूण राजाने दस्तक दिली. त्यानंतर सतत पाऊस पडतच आहे. मराठवाड्यात जालना  जिल्ह्यात सर्वाधिक 668 मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे. त्याखालोखाल औरंगाबाद 643, हिंगोली 641, परभणी 516, नांदेड 497, बीड 456, लातूर 405 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 308 मिमी पाऊस पडला आहे. औरंगाबाद जालना आणि बीड या तीन जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास दुप्पट पाऊस पडला आहे. तर परभणी, हिंगोली सरासरी ओलांडली. मात्र लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या तीन जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी ओलांडली नाही. दरम्यान जून- जुलै महिन्यात सुसाट सुटलेली पावसाची बुलेट ट्रेन ऑगस्टमध्येही सुसाट धावतच आहे. गेल्या 17 दिवसात तब्बल दहा दिवस पावसाचे राहिले आहेत. सरासरीच्या 129 टक्के पाऊस ऑगस्ट महिन्यात पडला. या सलग पावसाने मूग उडीद शेंगा खराब होत आहे. 
तीन जिल्ह्याला मोठा फटका!
दरम्यान सततच्या पावसाने औरंगाबाद जिल्ह्यातील 53 हजार हेक्टरवरील मूग पिकांचे नुकसान झाले आहे. 42 हजार हेक्टरवरील उडीद तर 10 लाखांहून अधिक हेक्टरवरील कापूस तसेच 2 लाख हेक्टरवरील मका पिकालाही धोका निर्माण झाला आहे. मराठवाड्यात 48 लाख 22 हजार 559 हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक 14 लाख 76 हजार 470 हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. मका 2 लाख 36 हजार 519 हेक्टर,  मूग 1 लाख 47 हजार 753 हेक्टर तर 1 लाख 47 हजार 793 हेक्टरवर उडीद पीक ,बाजरी 1 लाख 9 हजार 364 हेक्टर वर घेण्यात आली आहे.
औरंगाबाद जालना बीड या तीन जिल्ह्यातील पिकांचे क्षेत्र (हेक्टर)
मुग : औरंगाबाद 12443 जालना 22 हजार 770 बीड 1664
उडीद : औरंगाबाद 4079 जालना 2564 बीड 27 हजार 93
कापूस : औरंगाबाद 391243 टॅक्टर जालना 3 लाख 7 हजार 7, बीड 3 लाख 18 हजार 149 
मक्का : औरंगाबाद 1 लाख 5 हजार 947 जालना 42 हजार 243 बीड 1865
मराठवाड्यात पडलेल्या पावसाची टक्केवारी
औरंगाबाद 177, जालना 172, बीड 137, लातूर 93, उस्मानाबाद 88, नांदेड 93, परभणी 105, हिंगोली 120
सतत पाऊस
814ऑगस्ट - 15.8 मिमी
815 ऑगस्ट - 6.7
816 ऑगस्ट - 12.3
817 ऑगस्ट - 17.3
काय म्हणतात तज्ज्ञ
यावर्षी मराठवाड्यावर निसर्गाने कृपा केली असली तरी आता जास्त पावसाने पिके हातची जाण्याचा धोका आहे.  सर्वाधिक पटवा मूग -उडीद यासारख्या कडधान्य पिकांना बसण्याची शक्यता आहे. शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पिके वाचवण्यासाठी नत्राची फवारणी, युरियाचा वापर करावा. फळबागांसाठी उघडीप असल्यावर पाणी निचरा करावा. त्याचबरोबर 22:3 ची  फवारणी करावी. दहा लिटर पाण्यामध्ये 3.5 मिली  प्लॅनो फ्लिक्स वापरावे व फवारणी करावी. कपाशी तसेच मका वर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कॉपर ऑक्सिक्लोराईड त्याचबरोबर बेन्सिंग चा वापर लाभदायक ठरतो.
- डॉ. भगवानराव कापसे,
 कृषी शास्त्रज्ञ
पावसाने यावर्षी मराठवाड्यातील दोन विभाग केले आहेत. औरंगाबाद जालना, बीड, हिंगोली या जिल्ह्यात चांगला पाऊस बरसत आहे तर लातूर उस्मानाबाद नांदेड हे तीन जिल्हे अजूनही सरासरीपेक्षा कमी पावसाचे आहेत. गेल्या बुधवारपासून सलग पाऊस कोसळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त करीत आहेत. मूग काढणीला आल्याने फटका बसण्याची शक्यता आहे. मर रोग आल्यास त्याचबरोबर जैविक बुरशीनाशकाचा वापर फायदेशीर ठरतो. दहा लिटर पाणी उकळून थंड करून त्यात गूळ टाकावा त्यानंतर जैविक बुरशीनाशक मिसळून पिकावर फवारणी करावी. त्यामुळे मर रोग नाहीसा होऊ शकतो. सल्फरचा वापर केल्यास पिकांवर कीड रोग राहणार नाही.
- उदय देवळाणकर, 
कृषी शास्त्रज्ञ

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker