पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्या चेहर्याला संधी द्यावी, अशी मागणी करीत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक सुरू असताना कदीर मौलाना तिथे आले. मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष काम करणार्या नवतरुणांना अजूनही संधी मिळाली नाही. मात्र पक्षाचे काम करीत नाहीत त्यांना पक्षाने भरपूर संधी दिल्याचा आरोप त्यांनी आ.चव्हाण यांचे नाव न घेता केला. नव्या चेहर्यांना संधी द्यावी अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करणार असल्याचे मौलाना यांनी स्पष्ट केले.
सतीश चव्हाण यांच्यावर निशाणा !
पक्ष देईल तो उमेदवार मान्य असेल असे सांगतानाच काम न करणार्या पक्षाने मोठी संधी दिल्याचा आरोप आमदार चव्हाण यांचे नाव न घेता केला. यावेळी मात्र नव्या दमाचा चेहर्याला पक्षाने संधी द्यावी. पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन अशी मागणी करणार असल्याचे मौलाना यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधील मतभेद आता चव्हाट्यावर आहेत.










