मनपा निवडणूकीत महाविकास आघाडी करा - डॉ. देहाडे
महानगरपालिकेचे निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी करून लढवावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस अनु.जाती कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब खोरात, अशोकराव चव्हाण, अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. झुम अॅपवर झालेल्या बैठकीला खा. राजीव सातव, संपत कुमार, प्रकाश मुगदीया, कल्याण काळे, विलास औताडे, हिशाम उस्मानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोविड च्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच संघटन बांधनी, आगामी निवडणूका अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्या दृष्टीने काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी लवकरच निर्णय घेऊन मित्र पक्षांशी बोलणी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.