औरंगाबाद :- महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी सर्वच्या सर्व 115 जागांची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीचा अजूनही ताळमेळ नसल्याने काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे .दुसरीकडे स्वबळावर लढणार्या भाजप आणि एमआयएम पक्षाने आघाडी घेत उमेदवारी अर्जाचे वाटप सुरू केले. आठवडाभरात एमआयएमकडे 408 उमेदवारी
आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर !
दरम्यान शिवसेनेसोबत आघाडी करण्याची तयारी काँग्रेस नेते दाखवत असले तरी वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र अद्यापही सुरू झाले नाही. दुसरीकडे स्थानिक नेते वेगळे लढ्यावर ठाम आहेत. काँग्रेस वेगळी लढली तर किमान 35 ते 40 जागा जिंकू शकते, असाही मतप्रवाह स्थानिक नेत्यांमध्ये दिसून येतो. शिवसेनेने भाजपचे किशनचंद तनवाणी यांना आपल्याकडे खेचत दमदार पाऊल टाकले. आता आणखीही काही नेते शिवसेनेच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे आघाडी झाली नाही तर शिवसेना 115 जागांवर उमेदवार देण्याची तयारी करत आहे. येत्या शनिवार अथवा रविवार पासून उमेदवारी अर्जाचे वाटप सुरू होईल, असे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले.
कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद
भाजपने मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज याचे वाटप सुरू केले आहे. काल पहिल्याच दिवशी 187 उमेदवारी अर्जाचे वाटप झाले. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने महानगरपालिका निवडणूक लढणार आहे. कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने उत्साह वाढला आहे.
- डॉ. भागवत कराड, मनपा निवडणूक उपप्रमुख, भाजप
आमची 115 जागांवर तयारी !
काँग्रेसने मनपा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. शहराती 115 वार्डात उमेदवार उभे करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊ शकतो. मात्र अजून कोणत्याही बैठका झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर आज तरी आम्ही सर्वच्या सर्व जागा लढण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत.
- नामदेवराव पवार,
शहराध्यक्ष, काँग्रेस
अर्ज वाटप झाले. तर काल एकाच दिवसात भाजपतर्फे 187 उमेदवारी अर्ज वाटप झाले आहेत. येत्या शनिवार किंवा रविवार पासून शिवसेनाही उमेदवारी अर्ज वाटप करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात बदललेल्या राजकीय घडामोडीनंतर आता औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार यात शंका नाही. पारंपारिक मित्र शिवसेना-भाजप यावेळी एकमेकांच्या विरोधात लढणार आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी शिवसेनेसोबत आघाडी करते की नाही, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. भाजप व एमआयएमने मात्र स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे.

वंचित आघाडीची बोलणी अद्याप कोणत्याही पातळीवर पोहोचली नसल्याने एमआयएमने अर्ज वाटप सुरू केले. पक्षाकडून संपूर्ण 115 वार्डासाठी उमेदवारी अर्जांचे वाटप होत आहे. आतापर्यंत एमआयएमकडे 408 उमेदवारी अर्जाचे वाटप झाले आहे. भाजपनेही स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली असून कालपासून उमेदवारी अर्जाचे वाटप सुरू झाले आहे. शहरातील 115 वार्डात उमेदवार देण्याची तयारी भाजपने केली आहे. काल एकाच दिवसात 187 उमेदवारांनी अर्ज नेल्याची माहिती सूत्रांनी दिली.