मराठा आरक्षणाचे लोन ग्रामीण भागात

Foto
मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे लोहगाव फाट्यावर लक्षवेधी आंदोलन
 औरंगाबाद-पैठण मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.ही स्थगिती त्वरित उठविण्यात यावी व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत .आज पैठण तालुक्यातील ढोरकीन जवळील लोहगाव फाट्यावर मराठा क्रांती ठोक मोर्चा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.आंदोलनामुळे पैठण औरंगाबाद रोडवरील वाहतुकीची एक तास कोंडी झाली होती.त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारद्वारे निर्णय घेण्यात आला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच यास स्थगिती दिली. 
राज्य सरकार मराठा समाजाची बाजू मांडण्यात असमर्थ ठरले त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज पैठण रोडवर लोहगाव फाट्याजवळ सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनादरम्यान हिंसक घटना घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक गोरक्ष भांगरे, पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्यासह औरंगाबाद येथील दंगा काबू पथक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी आंदोलन कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.अशा घोषणा दिल्या. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी स्वतः देवगाव फाटा येथे येऊन आंदोलनकर्त्या  कार्यकर्त्यांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker