मनपाचे कोरोना रुग्ण वाढीला प्रोत्साहन
कोरोनाने सर्वत्र थैमान घातलेले आहे. त्यात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 31 हजार 772 वर गेली आहे. त्यातच दुसरीकडे बाहेरून येणार्या नागरिकांची तपासणी देखील बंद केली आहे. त्यामुळे सिटी एंट्री पॉइंटवर अनेकठिकाणी कर्मचार्यांनी हातातील ग्लोज, मास्क, तपासण्यासाठी वापरण्यात आलेले पीपीई कीटसह आदी साहित्य त्याच ठिकाणी फेकून दिल्याचे चित्र हर्सूल टी-पॉइंट येथे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना आणखी धोका वाढण्याची शक्यता असून मनपा कोरोना रुग्ण वाढीला प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे. हर्सूल, केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, कांचनवाडी, नगरनाका, दौलताबाद टी पॉईंट याठिकाणी तपासणी सुरू होती. प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने आता या सर्व ठिकाणी टेस्ट बंद करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तपासण्या करणार्या कर्मचार्यांनी हातातील ग्लोज, मास्क सह आदी साहित्य त्याच ठिकाणी फेकून दिल्याचे दिसून येत आहेत.