चिखलठाणा एमआयडीसी भागात उभारण्यात आलेल्या कोविड-१९ रुग्णालयाचे शुक्रवारी (दि.१२ जून रोजी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. २५० बेडचे हे हॉस्पिटल महापालिकेला हस्तांतरित केले जाणार असून, महापालिका प्रशासनाने त्यासाठी सुमारे १४० पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. १३ एमडी डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, टेक्नीशियन अशा पदांची भरती केली जाणार आहे.
शुक्रवारी लोकार्पणानंतर रुग्णालय महापालिकेच्या ताब्यात येईल. मात्र रुग्णालय चालविण्यासाठी महापालिकेकडे अत्यावश्यक स्टाफ नाही. त्यामुळे महापालिकेने गुरुवारी १४० पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
* सुरुवातीला जिल्हा रुग्णालयाची मदत
मुलाखतीनंतर डॉक्टर, नर्ससह इतर कर्मचारी रुजू होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयाची मदत घेऊन येथे कोविड-१९ रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
* अशी आहेत पदे
वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन)- १३
वैद्यकीय अधिकारी-३०
हॉस्पिटल व्यवस्थापक-२
स्टाफ नर्स-६३
एक्सरे टेक्नीशियन-२
इसीजी टेक्निशियन-२
लॅब टेक्निशियन-६
फार्माशिस्ट-८
भांडारपाल-२
डीईओ-४
वॉर्ड बॉय-२०













