... तर मोदी जेलमध्ये जातील: पृथ्वीराज चव्हाण

Foto

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राफेल प्रकरण मोठे गाजत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.   राफेल प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असून आमचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करु, चौकशीत तथ्ये समोर आली तर नरेंद्र मोदी राफेल  प्रकरणी जेलमध्ये असतील अशी भविष्यवाणी औरंगाबाद येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण  यांनी  केली आहे. 

राफेल कराराविषयी  माहिती देताना ते म्हणाले कि, युपीए सरकारच्या काळात राफेल विमानासाठी ५२८ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. मात्र मोदी सरकारने अंबानींना फायदा पोहचवण्यासाठी या करतात मोठे बदल केले.  त्यामुळे आता एका राफेल विमानाची किंमत तब्बल १६७० कोटी रुपये आहे. यावरून या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड आहे असे ते यावेळी म्हणाले.  राफेल प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत असून राफेल करार झाल्यानंतर अंबानी यांच्या कंपनीला फ्रांस सरकारने ११०० कोटी रुपयांची करसवलत दिल्याची नवीन माहिती समोर आली असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 

मोदी, मुख्यमंत्री करतात ब्लॅकमेल 
भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंग विषयी विचारले असता, पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस विरोधकांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याची धमकी देत आहेत. भाजप साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करत असून साखर पट्ट्यातील अनेक नेत्याची ब्लॅकमेलिंग करून मुख्यमंत्र्यांनी अनेक नेत्यांचा भाजपप्रवेश केला अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांवर केली आहे. अनेक साखर कारखानदाराच्या मागे  आजही सरकारने चौकशीचा ससेमिरा लावला असल्याचे ते यावेळी म्हणाले.