सिल्लोड, (प्रतिनिधी) : नगर परिषद निवडणूक २०२५ च्या सार्वजनिक निवडणूकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदी ने महाविकास आघाडीत च्या नेतृत्व खाली काँग्रेस पक्ष सर्व जाती च्या लोकाना सोबत घेऊन निवडणूक लढणार व इच्छुकानी तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय अल्पसंख्याक विभाग चे सरचिटणीस कैसर आझाद शेख, शहराध्यक्ष शेख फेरोज अकबर, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन खासदार डॉक्टर कल्याणराव काळे, ग्रामीण जिल्हा प्रभारी माजी खासदार तुकाराम रेंगे सिल्लोड सोयगाव विधान सभा मतदारसंघ डॉक्टर जफर खान यानी संभाजीनगर नगर येथील गांधी भवन येथे काँग्रेस आय पक्षा च्या सिल्लोड च्या इच्छुक उमेदवार मूलाखाती च्या वेळी केले आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष किरणभाऊ पाटील डोणगावकर, प्रदेश उपाध्यक्ष कमाल फारुकी, सरचिटणीस मोहनराव देशमुख, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे, सिल्लोड सोयगाव विधान सभा युवक काँग्रेस अध्यक्ष आवेस आझाद, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, डॉक्टर इसरार, डॉक्टर सरताज पठाण, अदी नेते उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष पदा साठी शेख कैसर आझाद, शांतीलाल अग्रवाल, शेख फेरोज अकबर आणी नगर सेवक इच्छुक उमेदवाराची मूलाखात घेण्यात आली. काँग्रेस आय पक्षाचे न.प. निवडणूकीत लढणारे इच्छुक उमेदवारांनी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन तालुकाध्यक्ष भास्कर घायवट पाटील व शहराध्यक्ष शेख फेरोज अकबर यांनी केले.











