घरोघरी नागपंचमीचा साजरा होतोय उत्सव

Foto
 श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सण आहे. या दिवशी घरोघरी पारंपरिक पद्धतीने नागदेवताची पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. ही परंपरा यंदाही कायम ठेवून महिलांनी आज सकाळपासूनच नागपंचमीच्या निमित्ताने घरोघरी पूजा केली. यावेळी ओम नमः शिवाय चा जप करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
प्रत्येक वर्षाच्या श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागपंचमी हा अनादिकाळापासून चालत आलेला सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. आज नागपंचमीच्या दिवशी दूध, खीर, लाह्या याचा नैवेद्य नागदेवतेला दाखवून पूजा करण्यात आली. आजच्या दिवशी उकडलेले पदार्थ बनविले जातात. त्यानुसार आज घरोघरी पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच या दिवशी झोका खेळण्याची देखील अत्यंत महत्त्व आहे. परंपरागत ग्रामीण भागातील गावांमध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. परंतु शहरी जीवनामध्ये अशा मोठ्या प्रमाणात साजरा करणे शक्य नाही. कारण शहरात मुबलक जागा उपलब्ध नसल्यामुळे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होत नाही. परंतु नागपूजन मात्र घरोघरी न विसरता सर्व करतात. हीच परंपरा यावर्षीही कायम ठेवली असून महिलांनी सकाळी लवकर उठून घरोघरी रांगोळ्या काढून आज सकाळपासूनच नागदेवताची पूजा करून नागपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी देवासमोर दिवा लावून नैवेद्य ठेवून धूप, अगरबत्ती लावून ओम नमः शिवायचा जप करण्यात आला. तसेच समृद्ध अधिवासाचे प्रतीक, शेतकर्‍यांचा मित्र आणि निसर्ग साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शहरातील महिलांनी आज सकाळपासूनच नागपंचमी उत्साहात साजरी केली असल्याचे रामदूत मुळे गुरुजी यांनी सांगितले.