महापोर्टल बंद राज्य सरकारने काढले परीक्षा घेण्यासाठी नवे टेंडर

Foto
औरंगाबाद :  राज्यातील 72 हजार पदांच्या मेगाभरतीसाठी फडणवीस सरकारने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केले, मात्र आता राज्य सरकारच्याच महाआयटी विभागाने नव्या स्वरूपात आयटी कंपनीमार्फत मेगाभरतीसाठी नव्याने टेंडर काढण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी टेंडरची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पदभरतीच्या परीक्षा एमपीएसद्वारे घेण्यात याव्यात, या राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या उमेदवारांबरोबरच लोकप्रतिनिधींच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
 फडणवीस सरकारने सरकारी पदभरतीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी महाआयटी विभागामार्फतच महापरीक्षा पोर्टलची निर्मिती केली होती. या पोर्टलद्वारे कंत्राट मिळालेल्या खासगी आयटी कंपन्यांच्या साह्याने पदभरतीच्या परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, या परीक्षांमध्ये सुरुवातीपासून गैरप्रकार झाल्याचे बोलले जाते. त्यातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये राज्यभर गोंधळ उडाला होता. या प्रकरणाला वादग्रस्त वळण लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापरीक्षा पोर्टलकडून घेण्यात येणार्‍या परीक्षांना स्थगिती दिली. त्यानंतर सरकारने पोर्टल बंद करण्याचा निर्णयही जाहिर केला होता