राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सलग दुसऱ्या दिवशी सुरु आहे. आज औरंगाबाद आणि नागपूरचे पोलीस अधिकारी बदलण्यात आले आहेत.
औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली करण्यात आली. तर त्यांच्याजागी निखील गुप्ता यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
निखील गुप्ता हे २००३ ते २००५ या कालावधीत पोलीस उपायुक्तपदी कार्यरत होते. अत्यंत शिस्तप्रिय आणि धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. २००५ साली औरंगाबाद मधून ते सयुंक्त राष्ट्र संघटनेच्या शांतीसेनेत प्रतिनियुक्तीवर गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. यानंतर ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते. सध्या ते हैदराबाद येथील आयपीएस ट्रेनिंग सेंटर येथे कार्यरत होते. प्रतिनियुक्तीचा पाच वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यावर ते महाराष्ट्र केडर मध्ये परत आले. आज १५ वर्षानंतर गुप्ता औरंगाबादला पोलीस आयुक्तपदी बदली झाली.