मनसेचा राडा, अॅन्टीजेन तपासणी पाडली बंद
अॅन्टीजेन टेस्ट केल्यानंतर मनपाने ताबडतोब सर्टिफिकेट द्यावे अशी मागणी करून मनसेने आज हडको टी.व्ही. सेंटर भागातील अॅन्टीजेन टेस्ट बंद पाडली.
महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील व्यावसायिकांसाठी कोरोना तपासणी बंधनकारककेली आहे. अशी तपासणी करून घेतल्याशिवाय कोणताही व्यापारी दुकान सुरू करू शकत नाही, असे निर्बंध त्यांनी लादले आहेत. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी टेस्ट करून घेत आहेत. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचे सटिफिकेट देण्यात येत नाही. त्यामुळे त्यांच्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. व्यापार्यांचे म्हणणे असे की, सर्टिफिकेट देण्यात आले तरच आम्ही निगेटिव्ह असल्याचे ग्राहकांना सांगता येईल. अन्यथा व्यापार करणे अवघड होऊन बसले आहे. दरम्यान,व्यापार्यांमधील असंतोषाचा कानोसा घेऊन मनसेने आज टीव्ही सेंटर भागातील मनपाच्या पथकाकडे टेस्ट झाल्याबरोबर संबंधिताला सर्टिफिकेट देण्यात यावे अशी मागणी केली व येथील तपासणी बंद पाडली.














