..आता बँकाही कोरोनाच्या विळख्यात
कोरोना संसर्गाची आता सामाजिक लागण सुरू झाल्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शासकीय कार्यालये संसर्गाच्या विळख्यात सापडली असून आता बँकांनाही ग्रासले असल्याचे दिसून येते. काल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिडको मुख्य शाखेत कर्मचार्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. काही कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला होता. कोरोना संसर्गाची लागण आता शासकीय अधिकारी कर्मचार्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात गेल्या दोन आठवड्यात अधिकारी कर्मचार्यांना लागण झाली होती. दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिसाद पक्षाचे अधिकारी संसर्गग्रस्त झाले आहेत. शहरातील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, यासह घाटी तसेच मेलट्रॉन कोविड केअर सेंटर, जिल्हा रुग्णालयातही कर्मचारी बाधित होत आहेत. या पाठोपाठ आता बँकांचे अधिकारी कर्मचारीही संसर्गाची होत असल्याने चिंता वाढली आहे. कालच सिडकोतील एसबीआयच्या मुख्य शाखेत सर्व कर्मचार्यांची टेस्ट करण्यात आली. या शाखेतील कर्मचार्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच कर्मचार्यांची चाचणी करण्याचा निर्णय बँक प्रशासनाने घेतला होता.