शंभर कोटींच्या रस्ते कामांचा नुसताच गाजावाजा, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहर बसच्या उद्घाटनाची महापौरांना लगीनघाई

Foto

औरंगाबाद- महानगरपालिकेच्या वतीने शंभर कोटी रुपये खर्च करून शहरातील ३१ रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्याबाबत मोठा गाजावाजा करण्यात आला असला तरी हा शुभारंभ लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. रस्ते कामाच्या कंत्राटदाराशी करावयाच्या करारातील तांत्रिक बाबी अपूर्ण असल्याने २३ डिसेंबर रोजी कामांचा मुहूर्त हुकून त्याचा शुभारंभ लांबणीवर पडणार आहे. मात्र त्या आधी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहर बस आणि एसटीपी प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांची लगीनघाई सुरू असल्याचे दिसून येत आहे.

 

मनपात सेना- भाजपची युती असली तरी त्यांच्यात मोठी धुसफूस आहे. सध्या शिवसेनेचा महापौर आहे. त्यामुळे सेनेच्या पदाधिकार्‍यांनी राज्य शासनाने मनपाला दिलेल्या शंभर कोटी रुपयांतून केल्या जाणार्‍या रस्ते कामाचा शुभारंभ सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते २३ डिसेंबर रोजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी कांचनवाडीतील भूमिगत गटार योजनेवर उभारण्यात येणार्‍या पाणी प्रक्रिया प्रकल्पाचे तसेच कचर्‍यापासून गॅस निर्मिती आणि शहर बसच्या लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पदाधिकारी मुंबईला गेले होते. पण मुख्यमंत्र्यांनी पदाधिकार्‍यांना भेट नाकारली होती. त्यानंतर ही शिवसेना २३ डिसेंबर रोजी विविध विकास कामांच्या शुभारंभावर ठाम आहे. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहर बसपाणी प्रक्रिया केंद्र आणि कचर्‍यापासून गॅसनिर्मिती प्रकल्पांच्या कारमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. रस्ते कामाच्या कंत्राटदारांशी कराट पूर्ण झाल्यानंतर रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री जानेवारी महिन्यात औरंगाबाद दौर्‍यावर येणार आहेत. यावेळी रस्ते कामांचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. 

 

एमजीएमच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'आओ उजाला करे' या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. हा कार्य्रक्रम आकांक्षाला समर्पित करत असल्याचे आयोजकांनी कार्यक्रमाआधीच जाहीर केले होते. या कार्यक्रमास एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रताप बोराडे उपस्थित होते. कदम म्हणाले की, 'सत्य, अहिंसा आणि समता ही त्रिसूत्री महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला दिली. गांधीजींच्या विचारांना तुम्हीही जीवनात उतरवा.' संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव यांनी महाविद्यालयाच्या यशाचा आढावा घेतला. 'वृंदगान' कार्यक्रमात गायन, देशभक्तिपर समूहनृत्य झाले. कार्यक्रमाची सांगता 'आओ उजाला करे' हे गीत गाऊन मेणबत्त्या पेटवून झाली.