वेरुळ- जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त दि. १३ ते २० डिसेंबर या महापर्वकालावर धर्मपीठाचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली, जय बाबाजी धर्मसंस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात आली असल्याची माहिती नियोजन समिती सदस्य राजेंद्र पवार यांनी दिली आहे.
या सोहळया दरम्यान अखंड नंदादीप
, जपानुष्ठान , महिला जप , हस्तलिखित जपानुष्ठान , विविध मैदानी खेळाच्या
स्पर्धा , राजकारणाचे
शुद्धिकरण व्हावे का या विषयावरती दि १६ डिसेंबर रोजी
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. तर दि १७ डिसेंबरला सामुदायिक विवाह सोहळा, दि १८ डिसेंबर रोजी
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, २५१ कुंडात्मक
जनकल्याण महायज्ञ मध्ये प्रत्येक दिवशी पाच हजार महिला भाविकांचा सहभाग असा हा
भव्य दिव्य सोहळा संपन्न होणार आहे.
याचबरोबर या सोहळयात अनेक
साधु, संत व मान्यवर उपस्थित राहणार
आहेत. दि १९ डिसेंबर रोजी
राजेश सरकटे यांचा गायन सोहळा संपंन्न होणार असून आठ दिवस चालणाऱ्या या सोहळयाचा
भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही सोहळा समिती मार्फत करण्यात आले आहे.








