९ जुगाऱ्यांसह ३ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त
कन्नड, (प्रतिनिधी): पिशोर पोलिसांनी अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन ठिकाणी छापे टाकून ९ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत एकूण ३ लाख १५ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२ (अ) अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
पहिली कारवाई १५ जुलै रोजी शिवारात करण्यात आली. यावेळी दीपक कोतकर, गणेश लोखंडे, दादाराव कोतकर
आणि संदीप लोखंडे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २७हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई १६ जुलै रोजी मध्यरात्री शफेपूर शिवारात झाली. येथे पाच जुगाऱ्यांसह तीन मोटारसायकली, इलेक्ट्रिक स्कुटी आणि अन्य साहित्य नेवपूर असा २ लाख ८७हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.













